वसई विरार शहर महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ वसई व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन (इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.०१ मे,२०२२ रोजी मा.आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर ‘बाईकेथॉन-२०२२’ रॅलीचा उद्देश जनतेमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करणे व महत्व पटवून देणे हा होता. चिमाजी आप्पा मैदान, वसई(प.) येथून सकाळी ०७.०० वाजता रॅली सुरु होवून न्यू विवा कॉलेज, विरार (प.) येथे रॅलीची सांगता करण्यात आली. श्री.पुरुषोत्तम पवार यांनी अवयवदानाचे महत्व व गरज याबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी प्रथम महापौर श्री.राजीवजी पाटील, माजी परिवहन सभापती श्री.भरत गुप्ता, महानगरपालिका उप-आयुक्त डॉ.विजयकुमार द्वासे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती चौधरी, श्री.बायजू जॉर्ज, रोटरी क्लब चे सदस्य, महानगरपालिका कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *