
वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना अभियान -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत’ DAY-NULM मध्ये स्थापन स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना बीज भांडवल व दिव्यांग पुनर्वसन केंद्र बोळींज, विरार पूर्व यांना अनुदानाचे धनादेश वितरण करणेचा कार्यक्रम दि.१६ जून, २०२२ रोजी महानगरपालिकेच्या मा.सर्वसाधारण सभागृह, ४ था मजला, मुख्यालय विरार (पु.) येथे संपन्न झाला.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत DAY-NULM मध्ये स्थापन स्वयंसहाय्यता महिला बचत गटांद्वारे सुरु असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगाला बीज भांडवल देऊन बळकटीकरण करण्यासाठी प्रती सदस्य ४०,०००/- याप्रमाणे एका गटास कमाल रु.४ लाख बीज भांडवल ६% व्याज दराने कर्ज स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येते. त्याअनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील १५ बचत गटांना राज्य शासनामार्फत रु.४६,८०,०००/- प्राप्त झाले होते. आयोजित कार्यक्रमाअंतर्गत संबंधित बचत गटांना प्राप्त रक्कमेच्या धनादेशांचे वाटप कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग पुनर्वसन केंद्र बोळींज, विरार पूर्व यांना दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव देणेकामी रु.१०,३८,३०५/- व दिव्यांगत्व वर आळा घालण्यासाठी तसेच दिव्यांगांच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी रक्कम रु.५,००,०००/- असे एकूण रु.१५,३८,३०५/- इतके अनुदानाचे धनादेश देखील मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.खासदार श्री.राजेंद्र गावीत, मा.आमदार श्री.राजेश पाटील, मा.प्रथम महिला महापौर सौ.प्रवीणाताई ठाकूर, मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, मा.अति.आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, मा.उप-आयुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी डॉ.किशोर गवस, मा.उप-आयुक्त सौ.नयना ससाणे, मा.उप-आयुक्त सौ.चारुशीला पंडित, अधीक्षक DAY-NULM श्री.नरेंद्र मानकर, दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख सौ.शीतल चव्हाण तसेच बचत गटांचे अध्यक्ष व सदस्य, दिव्यांग पुनर्वसन केंद्र बोळींजचे सदस्य व महानगरपालिका कर्मचारी वर्ग इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन आकांक्षा शहर स्तर संघ व DAY-NULM विभाग वसई विरार शहर महानगरपालिका यांच्यामार्फत करण्यात आले होते.