वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असून त्यांच्या अंत्यविधी करणाऱ्या जागांची फार कमतरता आहे. त्यातच अल्पसंख्याक समाजाचीही लोकसंख्या वाढलेली असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या दफनभूमी/कब्रस्तान ची योग्य व्यवस्था नाही म्हणूनच "बसिन तालुका मुस्लिम कब्रस्तान कमिटी" सुमारे 33 वर्षांपासून वसईतील विविध ठिकाणी जिथे अल्पसंख्याक समाजाची वस्ती आहे अश्या 26 ठिकाणी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान व 8 ते 10 ठिकाणी ख्रिश्चन आणि लिंगायत समाजासाठी दफनभूमीची मागणी आहे.
तसेच या कब्रस्तानच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून श्री समीर सुभाष वर्तक, उपाध्यक्ष:-पालघर लोकसभा युवक काँग्रेस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दिनांक 1 जुलै 2013 ते 3 जुलै 2013 मध्ये "आमरण उपोषण" केले होते. तेव्हा उपोषणाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी महानगरपालिका व जिल्हाधिकारी यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर अल्पसंख्याक विभाग, मंत्रालय येथे अनेक बैठका झाल्या आणि आमची मागणी असलेल्या 26 ठिकाणापैकी सर्वप्रथम दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176 मध्ये 11 एकर जागेत सर्वधर्मीय दफनभूमीचे काम चालू झाले. परंतु महानगरपालिकेच्या चुकीमुळे संबंधित बांधकामास पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने "राष्ट्रीय हरित लवादाने (NGT)" बांधकाम तोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर श्री कल्लन खान यांनी सहकाऱ्यांसोबत "KGN सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या" माध्यमातून लवकरात लवकर सर्वधर्मीय दफनभूमी मिळावी म्हणून "आमरण उपोषण" केले होते.
या सर्वधर्मीय दफनभूमीसाठी श्री समीर सुभाष वर्तक आणि श्री कल्लन खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आंदोलनासोबतच सातत्याने पाठपुरावा चालू होता त्यामुळे मागील 5 ते 6 वर्षांपासून रखडलेले *दिवाणमान येथील सर्व्हे नंबर 176* मधील सर्वधर्मीय दफनभूमीचे काम वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मा. श्री अनिलकुमार पवार यांनी आवश्यक सर्व परवानग्या घेऊन मागील दीड ते दोन महिन्यांपूर्वी या सर्वधर्मीय दफनभूमीचे काम चालू केलेले आहे आणि लवकरच काम पूर्ण होऊन वसईतील सर्वधर्मीय नागरिकांची दफनभूमीच्या अपुऱ्या जागेअभावी होणारी गैरसोय समाप्त होणार आहे.
म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि यासाठी उपोषण करणारे श्री समीर सुभाष वर्तक, के जी एन सोशल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपोषणकर्ते श्री कल्लन खान आणि बसिन तालुका मुस्लिम कब्रस्तान कमिटीचे सचिव श्री फारूक मुल्ला यांनी सहकाऱ्यांसोबत *महानगरपालिका आयुक्त मा. श्री अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन आभार मानले.*
यावेळी महाराष्ट्र काँगेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री टोनी डाबरे व श्री अम्मार पटेल, वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फूर्ट्याडो, कार्याध्यक्ष श्री संदीप किणी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन कुडु, श्री रोहित कुडु, adv खालिद शेख, श्री जमील देशमुख उपस्थित होते.