कोविड-१९ प्रतिबंधक लस वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार आज दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी वरुण इंडस्ट्रीज, वालीव, वसई पूर्व येथील लसीकरण केंद्रावर वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाचे मा.उपायुक्त डॉ.किशोर गवस, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा वाळके व इतर वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सदरील लस देण्यात येत असून आज एकूण ६२ लाभार्थ्यांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली. लसीकरण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले नाहीत.
या लसीकरणाच्या शुभारंभास मा.आमदार श्री.क्षितीज ठाकूर, मा.आमदार श्री.राजेश पाटील, मा.आयुक्त श्री.गंगाथरन डी., मा.माजी महापौर श्री.प्रवीण शेट्टी, मा.माजी महापौर श्री.राजीव पाटील, मा.माजी महापौर श्री.नारायण मानकर तसेच माजी मा.नगरसेवक , मा.नगरसेविका व इतर मान्यवर उपस्थित होते.

    


                                      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *