वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शासनाचे गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे शहरातील सफाई कामगारांकरिता The Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act 2013 अन्वये सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज योजनेअंतर्गत गटार सफाई व शौचालय सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या उदधाराकरिता विविध योजना राबविण्यात येत आहेत.
महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या सुरक्षिततेकरिता शहरातील सर्व प्रकारच्या गटारांची स्वच्छता करणे कामी महानगरपालिकेने ६ अत्याधुनिक सक्शन कम जेटींग मशीन खरेदी केलेल्या आहेत. यामध्ये कोणत्याही सफाई कामगाराला प्रत्यक्ष गटारामध्ये न उतरता सक्शन कम जेटींग मशीनद्वारे गटारामधील गाळ सफाई करण्यात येणार आहे.
तसेच सार्वजनिक शौचालय, खाजगी घरे व इमारतीच्या शौचालयाच्या सौचटाक्या सफाई करिता ५ सक्शन मशीन (मैला टॅकर) प्रस्तावित असून महानगरपालिकेकडून त्या लवकरच खरेदी करण्यात येणार आहेत.

                                                                
                                          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed