
वसई विरार शहर महानगर पालिकेतील कायमस्वरूपी कामगारांना वसई विरार शहर महानगर पालिकेकडून सातवा वेतन आयोगा नुसार वेतन अदा करण्यात येत आहे. परंतु आमच्या ठेकेदार सभासद कामगारांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन अदा करण्यात येत नाही. तरी ठेकेदार कामगारांनाही कायम कामगारांना प्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार वेतन अदा करण्यात यावे .व सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. त्या दिवसापासून वेतनातील फरक कंत्राटी कामगारांना तात्काळ अदा करण्यात यावा .कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन या न्यायानुसार महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्ट लेबर 1970 नुसार कायम कामगार प्रमाणे सर्व सुविधा भत्ते देण्यात यावेत. अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस विठ्ठलजी गोळेसाहेब ह्यांच्या सूचनेनुसार आज वसई विरार महानगरपालिका आयुक्त मा.डी. गंगाधरण ह्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम मुळीक तसेच प्रदेश सचिव अरविंद बेर्डे यांनी भेट घेऊन दिले माननीय आयुक्त यांनी लवकरात लवकरच सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासित केले,
