वाहनांची कागदपत्रे गहाळ असल्याचे प्र.सहा. आयुक्त मनाली शिंदे यांनी जाहीर केले.

जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांचावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करा-महेश अंबाजी कदम

वसई विरार शहर महानगरपालिका ही अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्यांनी चर्चेत असतेच , पालिकेतील प्रत्येक विभागात काम करणारा अधिकारी हा निकृष्ट दर्जाचा असल्याने अनेक नागरिकांना समस्या निर्माण होत असतात.
अशाच एक प्रकार माहिती अधिकारात भारतीय जनता पार्टीचे विरार शहर मंडळ उपाध्यक्ष-महेश अंबाजी कदम यांनी उघडकीस आणलाआहे,
वसई विरार शहर महानगरपालिकेत वसई,माणिकपूर, नालासोपारा,विरार शहरातील घनकचरा संकलन करण्यासठी कॉम्पॅक्टर आणि टिपर खरेदी करण्यात आले होते त्यानुसार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात सन-२०१८ मध्ये २० कॉम्पॅक्टर वाहने खरेदी करण्यात आली होती व त्या वाहनाची नोंदणी वसई विरार शहर महानगर पालीकेच्या नावे सन-२०१९ मध्ये जुलैच्या महिन्याच्या दरम्यान उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई येथून वाहनांची नोंद करून नोंदणी क्रमांक प्राप्त केले, नोंदणी क्रमांक प्राप्त झाल्यानंतर वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र, वाहनांचा परवाना,योग्यता प्रमाण पत्र आणि कराराचे प्रमाणपत्र हे परिवहन विभागाच्या कार्यालयातून मिळते,तर वाहनांचा विमा आणि पियुसी प्रमाण पत्र हे वाहनधारकांनी स्वतः काढायचे असते म्हणजेच पालिकेने संबधित वाहनाची कागदपत्रे वैधता संपल्यानंतर काढणे अनिवार्य होते.
मात्र सदर वाहनांच्या कागदपत्राची चौकशी केली असता वाहनांचे कागद पत्र गहाळ झाले आहेत असे वारंवार सांगण्यात आले,वास्तविक जर वाहनांची कागदपत्रे गहाळ झाली तर ती ताबडतोब नव्याने बनवून घेणे अपेक्षित होते पण २०२२ पर्यंत ती बनवली गेली नाहीत,
ती बनविण्याकरता पालिका प्रशासनास पाच वर्षांनी झोपेतून जागी झाल्याचे निदर्शनास आले, कारण घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्र,सहा आयुक्त मनाली शिंदे यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने जावक क्रमांक-व वि श म /आरोग्य/८३६/२२२चे दिनांक-०४/०३/२०२२ रोजीचे एक पत्रक उप प्रादेशिक परिवहन अधिकरी विरार यांचे तर मा.पोलीस निरीक्षक विरार पोलीस स्टेशन यांचे नावे जावक क्रमांक-व वि श म /आरोग्य/८६८/२०२२चे दिनांक-२८/०३/२०२२ रोजीचे पत्रक कागदपत्रे गहाळ झाल्याचे नमूद करून दिलेले आहे.
तर सदर पत्रात एकूण २० कॉम्पॅक्टर वाहने असून ०५ कॉम्पॅक्टर सुका कचरा संकलन करण्याचे तर १५ कॉम्पॅक्टर ओल्या कचरा संकलन करण्याचे काम इतर वाहनांसोबत शहरात करत आहेत.यांची खरेदी बिले,नोंदणी प्रमाणपत्र, विमा, व इतर कागदपत्रे गहाळ झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे.
तर कॉम्पॅक्टर खरेदीची बिले गहाळ झाल्याने मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे महेश कदम यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे कागदपत्रे गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्याच्या अथवा विभागातील जबाबदार व्यक्तीच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम-२००५ व त्यातील तरतुदी नुसार गुन्हा दाखल व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीचे विरार मंडळ उपाध्यक्ष-महेश अंबाजी कदम पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत असून भविष्यात संबधित जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करणार असल्याचे पत्रकारांशी बोले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *