वसई -: ( प्रतिनिधी ) केंद्रातील भाजपा सरकारच्या काळामध्ये मागील सात वर्षांपासून पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत, आता तर उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल 106 रुपये प्रति लिटर च्या वर गेलेल आहे, तर खाद्यतेल दोनशे रुपये लिटर च्या वर गेलेल आहे, इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. अशी गगनचुंबी भाववाढ काँग्रेसच्या काळामध्ये कधीही झालेली नव्हती परंतु केंद्रातील भाजपच्या सरकार कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन सामान्य जनतेवर होणारा अत्याचार उघड्या डोळ्या ने बघण्या शिवाय काहीच करायला तयार नाही. त्याच्या विरोधात संपूर्ण भारतभर अनेक आंदोलने चालू आहेत, शेतकरी आंदोलने चालू आहे, परंतु कुठल्याही आंदोलनाला हुकूमशाही सरकार न्याय द्यायला तयार नसून कोणत्याही प्रकारच्या किमती कमी करायला तयार नाहीत. अशा या कुंभकर्णी निद्रेत असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली आज दि 18 / 7 / 2021 रोजी सायकल रॅली आयोजन केले होते या मोर्च्या मध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांना आवर्जून भाग घेऊन केंद्रातील भाजप सरकारचं विरोधात घोषणा देत आपला विरोध नोंदवला तसेच काँग्रेस पक्षा तर्फे पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल,इत्यादी जीवनावश्यक वस्तूच्या वाढलेल्या किमती हुकूमशाही सरकारने तात्काळ मागे घ्यावे असे आव्हावन करण्यात आले
या सायकल रॅली मध्ये वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे संदिप कनोजिया , रेल्सन डिसोझा , साहिल वाझ , अक्षय थोरात , प्रिया चंद्रा , हुसेन , इत्यादी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *