

वसई (डॉ अरुण घायवट) वसई विरारसह पालघर जिल्ह्यात कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या रोगामुळे अनेक लोक मृत पावत आहेत. या रोगामुळे संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजलेला आहे. या रोगामुळे खाजगी दवाखान्यात उपचार केले जात नाहीत उपचार अभावी सुद्धा लोक दगावत आहेत इतकी भयावह परिस्थिती येथे दिसून येते. वसई विरारसह पालघर जिल्ह्यात रोजच 300 च्या वर कोविड चे रुग्ण सापडू लागल्यात. गम्मत म्हणजे यंदा एकही पावसाळ्यातील आजाराने आपले डोकं वर काढलेले नाही सर्व आजाराला सध्या एकच नाव आहे ते म्हणजे फक्त कोविड. एक बाजूला या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नसली तरी करोना चा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे त्यानंतर 1 लाखाच्या वर बिल झाल्यावर दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह येतो त्यामुळे येथील रुग्णसेवेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. दवाखान्यात गेलेला माणूस परत येत नाही म्हणून कोळी समाजाने वसईत मनपावर आगपाखड केलेली आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवा मगच रुग्णांना इकडून न्या असा पवित्रा घेऊन उपचार पध्द्तीवर अविश्वास व्यक्त केला आहे. कोविड मुळे येथील जनता आता स्वतःच काळजी घेत असताना दिसु लागली आहे. विनाकारण बाहेर पडायला कोणी तयार नाही. त्यामुळे रस्ते सुनसान झालेत.येथील रस्त्यावर फ़क्त रुग्णवाहीका चा आवाज येत आहे. इतकी भीती जनसामान्यांत पसरली आहे. ज्यावेळी वसई सह पालघर जिल्ह्यात कोविड चा एकही रुग्ण नव्हता तेव्हा 2 महिने येथे लॉक डाऊन पाळला गेला पण सध्या या भागात रोजच शेकडोने रुग्ण मिळत असताना या जिल्ह्यात लॉक डाऊन ची गरज नसल्याची एक बाब नवनिर्वाचित मनपा आयुक्तांनी शनिवारी घेतलेल्या सर्व पक्षीय बैठकीत नेत्याकडून व्यक्त झाली ज्या भागात कोविड रुग्ण सापडतील असा भाग कंटेनमेंट झोन जाहीर करून तेथे लॉक डाऊनची तरतूद करण्यात आली. सर्व पक्षीय बैठकीत झालेला हा निर्णय म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झालाय अस कोणी म्हटलं तर वावग वाटू नये कारण आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून हा निर्णय असेल तर अशा निर्णयाची कीव करावीशी वाटते कारण जीव वाचला तर आर्थिक घडी पुन्हा बसवता येईल इतकी समज या राजकारण्यांना नाही या बद्दल खंत वाटते. रुग्ण संख्या वाढत असताना ठाणे, पुणे, औरंगाबाद सारख्या जिल्हयात लॉक डाऊन करता येत असेल तर वसईसह पालघर जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर करायला आणि या रोगाला आळा घालण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट येथील राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी बघतात असा संतप्त सवाल विचारला जात आहे येथे लॉकडाऊन ची गरज नाही अस ज्या पक्षाच्या नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाटत आहे त्यानी कोविड सेंटर मध्ये जाऊन रुग्णाची खुशाल सेवा करावी म्हणजे तिकडे काय परिस्थिती आहे , मुडदे कसे उचलले जातात याची प्रचिती येईल त्यानंतर तरी वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात लॉक डाऊन ची गरज नाही अशी गरल तरी हे लोक ओकत बसणार नाही. वसई विरारसह पालघर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने आताच कडक।लॉक डाऊनची गरज आहे अन्यथा या जिल्ह्यातील कोविड रुग्ण संख्या आवाक्याच्या बाहेर जाणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.