विरार प्रतिनिधी : वसई-कोळीवाडा येथील हथिमोहल्ला येथील जामे पैलेस इमारतीबाहेर कचरा सचला असून; वसई-विरार महापालिकेकडून हा कचरा उचलला जात नसल्याने रहिवाशांनी काळजी व्यक्त केली आहे.

जामे पैलेस या इमारतीबाहेर असलेली कचराकुंडी मागील काही दिवस भरून वाहते आहे. मात्र वसई-विरार महापालिकेकडून अद्याप हा कचरा उचलला गेलेला नाही.

याबाबत अनेकदा या भागातील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी; पालिकेकड़े तक्रार केली होती; मात्र यावरही अद्याप कार्यवाही झालेली नाही.

हा कचरा असाच राहिल्यास त्यातून विविध आजार पसरण्याची शक्यता व्यक्त करतानाच; या कचराकुंडीशेजारी महावितरणचा ट्रांसफार्मर असल्याने आग लागू शकते, अशी काळजीही शेख यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *