
(दि२२,मनोज बुंधे,वाडा)पृथ्वीवरील नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक व पालघर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून मोनिका पानवे व काशवी पडवळे यांच्या जन्मदिनानिमित्त ठाणे व पालघर जिल्ह्यात फळझाडे वाटप करण्यात येत आहे. यातीलच वाडा पूर्व विभागातील पिंपरोळी (मोरेपाडा) येथे विलकोस, सारशी,कोने,शिरीष पाडा, तुसे, दुपारेपाडा, जांभुलपाडा,सावरखंड या गावातील प्रत्येकी ५ असे एकूण ५० शेतकऱ्यांना आंबे आणि शेवगा या फळझाडांचे वाटप संस्थेकडून करण्यात आले.
झाडांचे वाटप करताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.वाटप करण्यात आलेल्या फळझाडांची व्यवस्थित जोपासना आणि ती जिवंत आहेत की नाही याची पाहणी संस्थेकडून दरवर्षी करण्यात येते.फळझाडे वाटप करताना मोज पंचायत समिती सदस्य सागर ठाकरे,संचीता पाटील,संजीवनी मोकाशी, मनाली बुंधे इ.उपस्थिती प्रार्थनीय होती.यावेळी सागर ठाकरे यांनी कमी वेळात आपले मनोगत मांडून सामाजिक कार्याबद्दल संस्थेचे आभार मानले.