

वसई(प्रतिनिधी):सोमवार,दिनांक २२/०६/२०२० रोजी ग्राहकांच्या वाढत्या बिलाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, नवघर पूर्व येथे *कार्यकारी अभियंता श्री एस.एस. किन्नुर* यांची भेट घेण्यात आली. ह्या भेटी दरम्यान ग्राहकांना लॉकडाऊन च्या काळात जे वाढीव बिलासंदर्भात समस्या होत्या त्या विषयी सविस्तर चर्चा केली, ह्यावेळी श्री किन्नुर यांनी ही आलेली बिल कशाप्रकारे देण्यात आली ह्या विषयावर नीट समजावून सांगितले, तसेच जी आता आलेली बिल आहेत ती भरण्यास २ महिन्यांची मुदत देऊ त्या मुदती मध्ये टप्प्या टप्प्याने बिल भरणा करता येईल, अशी कक्ष जिल्हा प्रमुख श्री शंकर बने यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली.
यासाठी कार्यकारी अभियंता श्री एस एस किन्नुर यांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तर्फे निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी कक्ष जिल्हा प्रमुख श्री शंकर बने, कक्ष उप जिल्हा प्रमुख श्री दिपक बडगुजर, विभाग प्रमुख तथा उप कक्ष प्रमुख श्री राहुल कांबळे व शाखा प्रमुख श्री सुशांत धुळप उपस्थित होते.