
वसई च्या जनतेशी मुजोर पणे वागणाऱ्या पालिका आयुक्तांच्या विरोधात घेराव मोर्चाचा निर्धार ?
वसई (प्रतिनिधी): लाँकडाउन च्या काळात महावितरण कंपनीने रिडींग न काढता भरमसाठ विज बिल पाठवण्याच काम चालवले आहे.त्याच बरोबर वसई विरार महानगर पालिकेने शेकडो सफाई कामगारांना नोटिस न देता काहीही कारण नसताना अचानकपणे कामावरुन काढून कामगारांच्या कुटुंबाची पेटती चुल विझवण्याचे काम पालिकेचे आयुक्त गंगाधर डी.यांनी केले आहे.
ह्या विरोधात लाल बावटा व आदिवासी एकजूट संघटने च्या वतीने वसई विरार चे आयुक्त गंगाधर डी यांना अनेक निवेदन देण्यात आले, आयुक्तांनी संघटनेच्या निवेदनाला केराची टोपलि दाखवण्याचे काम केले आहे.
आयुक्तांनी चालवलेल्या मनमानी विरोधात लाल बावट्याचे जिल्हा कमेटी सदस्य कॉम्रेड शेरु वाघ यांनी मा.आयुत्तांना फोन करुन अगदी नम्र पणे कामगारांच्या प्रश्नांवर विचारपुस केली असता आयुक्तानी जा तुम्हाला काय करायचे ते असे उत्तर दिले असता शेरू वाघ यांनी मोर्चाचा ईशारा दिला ह्यावर आयुक्तानी मोर्चा काढा नायतर आंदोलन करा मला काय सांगता अश्या प्रकारे उडवाउडवी ची उत्तर देऊन जनतेचा अपमान केला आहे.असा अपमान लाल बावटा कधीच सहन करुन घेणार नाही अशी माहीती जिल्हा कमिटि सदस्य शेरू वाघ ह्यानी दिली त्याच बरोबर महानगर पालिकेला व पालिका आयुक्तांना निर्धारपणे घेराव घालण्याची तयारी भारताचा माक्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) व आदिवासी एकजूट संघटना यांनी आज वसई तालुक्यात बाईक रँली काढून प्रत्येक गाव पाड्या पर्यंत जाउन सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचुन मोर्च्याचे जोर दार प्रचार चालु केले आहे येत्या ९आँगस्ट ला सकाळी १० वाजता विरार जकात नाका सिग्नल जवळ संघटीत होउन काही अंतर ठेवुन तोंडाला मास लावुन सरकारने घालुन दिलेल्या सर्व नियमाचा पालन करून मोर्चा काढू जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत माहानगरपालिका व आयुक्त गंगाधर डी. यांना निर्धार पणे घेराव घालून बसु अशी माहीती लाल बावट्याचे कार्यकर्ते देत आहेत…