
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत वासळई सर्व्हे नंबर ६६/१/४/ ब या भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून सदरचे बांधकाम तात्काळ निष्कासित करून बांधकामधारकावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष तसनिफ़ शेख यांनी केली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत वासळई सर्व्हे नंबर ६६/१/४/ ब या भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. सदरचा भूखंड हरिश्चंद्र दामोदर पाटील यांच्या नावे असून सदरच्या बांधकामाला महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालयाकडून साधी नोटीस ही बजावण्यात आलेली नाही. लाच खाऊन अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याचे काम अधिकाऱ्यांनी केलेले आहे. सदरच्या अनधिकृत बांधकामामुळे शासनाचा प्रचंड महसूल बुडालेला आहे.
सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याकरिता तसनिफ़ शेख यांनी आयुक्त वसई विरार शहर महानगर पालिका, जिल्हाधिकारी पालघर जिल्हा, तहसीलदार वसई, ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती वसई यांना तक्रार दिली आहे.