स्नेहा जावळे वृत्त काव्य

========================

” विद्यमान उपेक्षीत ठरले “.
शिवसेनेला गनिमीकाव्यने लागतोय सुरुंग
उमेदवारांची यादी सांगण्यात शिवसेना दंग
भाजपात सर्व उमेदवारांची घोषणा झाली
विद्यमान उमेदवारांची गळती भाजपने केली
काही ठिकानी भाजपमध्ये दिसते बंडखोरी
मोदीची सुरु होणार प्रचाराची महाराष्ट्रवारी
फडवणिस गुन्हे लपवुनही उमेदवार झाले
आपल ते बाबल भाजपने पुरावेच दिले
राणेंच्या पक्षप्रवेशाचा मुहुर्त पुन्हा हुकला
वसई-विरारला ठाकुरांचा पगडा दिसला
मनसे स्वबळावर जोर धरत सज्ज झाली
वंचितनेही स्वत:ची छाप कायम ठेवली
राजठाकरे, पवारांनी ईडीचे वाजवले बारा
आयारामांमुळे कार्यकर्त्यांचा चढला पारा
पुण्यात शिवसेना कार्यलयाले टाळे लागले
विद्यमान अपेक्षित उमेदवार उपेक्षीत ठरले

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *