
विरार येथील विद्या विहार विद्यालयात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका मंगला परब, सहशिक्षिका दक्षता परब, जेष्ठ शिक्षक रामकृष्ण मेहता व इतर सहशिक्षक उपस्थित होते. सजवलेल्या पालकीतून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून जल्लोषात लेझीम पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाराजांच्या वेशभूषा परिधान केलेल्या मुलाची व मा जिजाऊची वेशभूषा परिधान केलेल्या मुलीची सहवाद्ये मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या विध्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीते सादर करीत सर्वानाच मंत्रमुग्ध केले. उर्वरित कार्यक्रम शाळेच्या सभागृहात सादर करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्था कोकण विभाग अध्यक्ष मा. बी. एस परब उपस्थित होते. शाळेतील या प्रसंगी विद्यार्थिनींनी पोवाडा गायन केले. सातवीतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे अनेक गुण कथन केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा विचारली. उत्तरे देणाऱ्या विदयार्थ्यांना वाचनीय पुस्तके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना संबोधित करत म्हणाल्या कि, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गुण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगिकारले पाहिजेत.