विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारचा दौरा केला. ज्यामध्ये त्यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याशी बैठक घेऊन वसई तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थिती वर केल्या गेलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून संबंधितांना योग्य ते आदेश दिले.
दौऱ्या दरम्यान प्रवीण दरेकर व आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपा वसई रोड मंडळाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अध्यक्ष उत्तम कुमार यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच वसई रोड मंडळाच्या कार्याचा कार्यअहवाल यावेळी त्यांनी भेट म्हणून दिला. कोरोना काळात वसईमध्ये भाजपा वसई रोड मंडळाकडून केल्या गेल्या कार्याची माहिती यावेळी त्यांनी दरेकर यांना दिली. राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री असे माजी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने हे काम चालू आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते असल्याचे उत्तम कुमार यांनी आवर्जून सांगितले.
दरेकर यांनी वसई गाव पारनाका येथील महानगरपालिकेच्या सभागृहात ही आढावा बैठक पार पडली. यावेळी पालिकेचे आयुक्त डी. गंगाधरण, प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, महापौर प्रवीण शेट्टी, भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक आदी उपस्थित होते. दरेकर यांनी यावेळी शासनाकडून आपणास कोणतीही मदत हवी असल्यास मी त्याच्यासाठी सर्वोतोपरी मदत करेन असे आश्वासन उपस्थितांना दिले.
प्रवीण दरेकर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन राज्यात चाललेल्या आयुक्त बदली वरून नाराजी व्यक्त केली. मागील 2 दिवसांपूर्वी तीन महानगरपालिकांच्या राज्य सरकारने तीन आयुक्तच्या बदल्या केल्या होत्या. यावर बोलताना त्यांनी सरकार आपले अपयश लपवण्यासाठी आयुक्तांच्या बदल्याकरत आहे. असे करून काही होणार नाही. यामुळे पालिकेची संपूर्ण घडी विस्कटून जाते व त्याचा परिणाम जनतेला होतो असे म्हणाले. जी. जी. कॉलेजमध्ये केलेल्या क्वांरणटाईन सेंटरचा त्यांनी आढावा घेतला. व योग्य ते आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *