

विरार येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांची तपासणी करून प्रमाणपत्र वितरित केले जाते. ग्रामीण रुग्णालयात येणार्या दिव्यांगांना बसण्यासाठी, बाथरूम आणि टॉयलेटची कोणत्याही प्रकाराची व्यवस्था नाही. ह्या रुग्णालयात प्रत्येक महिन्याचा पहिला व तिसरा गुरुवार अस्थिव्यंग दिव्यांगांना प्रमाणपत्र आणि प्रत्येक महिन्याचा दुसर्या व चौथ्या गुरुवारी मतिमंदांच्या प्रमाणपत्रांच्या तपासणी करण्यासाठी खूप दूरवरून लोक येत असतात.
विरार ग्रामीण रुग्णालय ह्या ठिकाणी तासनतास लाईनीत शारीरिक त्रास सहन करत उभे राहावे लागत असून ह्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा ही खूप तुटवडा असतो. याच बरोबर बेशिस्तीचे वातावरण सगळ्याच कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळते.
नेत्र तपासणी व प्रमाणपत्रांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागते .याची सोय वसई किंवा विरार आरोग्य केंद्रात व्हावी. अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी जिल्हाधिकारी यांना ऑनलाईन पोर्टल द्वारे मागणी केली आहे