● विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीच्या स्मरणपत्राचे निवेदन घेऊन सर्व पक्षीय संविधान कृती समितीच्या माध्यमातुन पदाधिकाऱ्यांनी वसई विरार महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त मा. अनिल पवार साहेब यांची घेतली भेट.

आज गुरुवार दिनांक ३/०२/२०२२ रोजी आंबेडकरी चळवळिच्या व समविचारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान कृती समितीच्या माध्यमातून विरार पूर्व मनवेलपाडा येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिक्रमा व उद्यान परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व विद्यार्थी अभ्यासिकेसाठी स्वतंत्र इमारत वस्तू उभारण्यात यावी अशा मागणीचे दि. १७/१२/२०२१ रोजीचे तत्काळिन आयुक्त डि. गंगाधरण यांना दिलेल्या निवेदनाचे स्मरण करुन देण्याकरिता स्मरणपत्र वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन देण्यात आले. सदर भेटी वेळी बहुजन पँथर पक्षाचे अध्यक्ष ऍड. किर्तीराज लोखंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पालघर जिल्हा अध्यक्ष गिरीश दिवाणजी,बहुजन समाज पार्टिचे जिल्हा निरिक्षक प्रा. डि.एन.खरे,संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मनोज रुके,बहुजन पॅंथरच्या महिला अध्यक्षा विजया रुखे, समाजसेविका अंजना देवकांत, व इतरहि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *