
● विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीचे निवेदन घेऊन सर्व पक्षीय संविधान कृती समितीच्या माध्यमातुन पदाधिकाऱ्यांनी पालघर लोकसभाक्षेत्राचे मान. खासदार राजेंद्र गावित साहेब यांची घेतली भेट.
आज सोमवार दिनांक २१/०२/२०२२ रोजी आंबेडकरी चळवळिच्या व समविचारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान कृती समितीच्या माध्यमातून विरार पूर्व मनवेलपाडा येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिक्रमा व उद्यान परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व विद्यार्थी अभ्यासिकेसाठी स्वतंत्र इमारत वस्तू उभारण्यात यावीअशा मागणीचे दि.१७/१२/२०२१ रोजीचे तत्काळिन आयुक्त डि. गंगाधरण यांना दिलेल्या निवेदनाचे व ३/०२/२०२२ रोजी संबंधीत मागणीचे स्मरण करुन देण्याकरिता स्मरणपत्र वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन देण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून आज सोमवार दिनांक २१/०२/२०२२ रोजी पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार मान. राजेंद्र गावीत साहेब यांची पालघर येथील शासकिय विश्रामगृह येथे भेट घेतली. सदर भेटी वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पालघर जिल्हा अध्यक्ष गिरीश दिवाणजी,बहुजन समाज पार्टिचे पालघर जिल्हा प्रभारी प्रा. डि.एन.खरे, समाजसेविका अंजना देवकांत, व इतरहि पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटि दरम्यान याविषयासंदर्भात मान.खासदार राजेंद्र गावित साहेब यांनी सकारात्मक भुमिका घेतली असुन येत्या शुक्रवार दि. २५ / ०२/२०२२ रोजी सकाळि ११.०० वाजता मान. खासदार राजेंद्र गावित साहेब यांची महानगरपालिका आयुक्तांबरोबर काहि विकासकामांच्या विषयासंदर्भात नियोजित बैठकिदरम्यान सदर विषयाबाबत आयुक्तांशी चर्चा केली जाईल असे आश्वासित करुन सदर बैठकिला संविधान कृती समितिच्या शिष्टमंडळाला उपस्थित राहण्याचे मा. खासदार गावित साहेबांनी सांगितले आहे.