

सोशल डिस्टेनसिंगचे सर्व नियम फाट्यावर मारून विरार बोळींज नाक्यावरील मटण विक्रेत्यांकडून ७०० रुपये किलो दराने मटण विक्री सुरू आहे.
मटण विक्रेत्यांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी ठराविक अटी आणि शर्तीवर शासनाकडून परवानगी देण्यात आलेली असून ह्या विक्रेत्यांनी सोशल डिस्टेनसिंगचे सर्व नियम पाळून मटण विक्री करणे अपेक्षित आहे.
मात्र विरार बोळींज येथे मटणाचा काळा बाजार सुरू असून मटणाची तब्बल ७०० रुपये किलो दराने विक्री सुरू झालेली आहे. ह्या मूळे एकीकडे सर्व सामान्य ग्राहकांच्या खिशाला चाट पडत असून दुसरीकडे विक्रेत्यांनी सोशल डिस्टेनसिंगचे नियम न पाळल्याने नागरिक कोरोनामूळे आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाचे संकट अजून गहिरे होत असताना अश्या प्रकारे अव्वाच्या सव्वा दराने मटण विक्रेत्यांकडून मटण विकत घेऊन आजारपणाला निमंत्रण देऊ नका असे आवाहन विरार मधील नागरिकांना करण्यात आले आहे