
◆ बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त


प्रतिनिधी
विरार- बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरार-मनवेल पाड़ा गांव आणि परिसरात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवार, ९ मार्च ते रविवार, १३ मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत चालणाऱ्या या उपक्रमांचे आयोजन बहुजन विकास आघाड़ीच्या माजी नगरसेविका हेमांगी पाटील व समाजसेवक विनोद पाटील यांनी केले आहे.
विरार मनवेल पाड़ा येथील साईबाबा मंदिर येथून या उपक्रमांची सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत या परिसरात नागरिकांना यूनिवर्सल पास, ई-श्रम कार्ड, आधार कार्ड, आरोग्य कार्ड आणि मतदान कार्ड त्यांच्या परिसरात शिबिर आयोजित करून बनवून देण्यात येत आहेत.
यापुढील कार्यक्रम ओमकार पार्क, चेतन अपार्टमेंट, दामोदर निवास, जीवदानी संकुल, सीएम नगर आणि परिसरात आयोजित करण्यात येणार आहेत. हा उपक्रम पुढील काळातही सुरु राहणार आहे.
या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्याचा आमचा उद्देश असल्याची माहिती माजी नगरसेविका हेमांगी पाटील व समाजसेवक विनोद पाटील यांनी दिली.