



रक्तदानाच्या आवाहनाला गोकुळधाम संकुलातील रहिवाशांचा उत्फुर्त प्रतिसाद
देशावर “कोरोना वायरसचे” संकट उभे असताना केंद्र व राज्य शासन त्याला मात देण्यासाठी अनेक उपाययोजना करित आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे व त्यांची टिम या संकटाशी सामना करण्यास जबाबदारीने सज्ज आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने “गोकुळधाम संकुल, फुलपाडा रोड , विरार (पु)” तथा सरला ब्लड बॅँक वसई (प.) यांच्या माध्यमातुन बुधवार दि.८ एप्रिल २०२० रोजी सकाळि १०वा. ते दुपारि ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास १०० च्या जवळ इच्छुकांनी आपल्या नावांची नोंदणी केली होती.त्यातील ५० हुन अधिक पात्र रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर शिबिराच्या वेळेस सोशल डिस्टंसच्या नियमांचे व आरोग्य विषयक काळजीचे तंतोतंत पालन केले गेले
आज देशासमोर व राज्यासमोर आलेल्या आपतीला तोंड देण्याकरिता आपल्या बांधवांना रक्तदानाच्या माध्यमातुन मदतिचा हात पुढे केला पाहिजे. या परस्थितीत रक्तदान हे आपले आद्य कर्त्यव्य आहे असे या रक्तदान शिबिरास उपस्थित प्रमुख अतिथि मा. स्थायी समिति सभापती सुदेश चौधरी यांनी मार्गदर्शकपर बोलताना सांगितले . तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात या संकटाच्यावेळीं सर्वप्रथम व महिलांचा प्रतिसाद लाभलेले एकमेव रक्तदान शिबिर नियोजनबद्ध रित्या हौसिंग सोसायटीने राबविले त्याबद्दल या शिबिरास उपस्थित प्रमुख अतिथि पत्रकार मयुरेश वाघ यांनी या शिबिराचे प्रमुख आयोजक महेश माळकर , गिरिश दिवाणजी , सिद्धि भगत व गोकुळधाम मधिल पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. या शिबिराकरिता समाजसेवक नितिन उबाळे यांनी १०० मासचे वितरण केले.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता गोकुळधाम फेडशरनेचे पदाधिकारी गोविंद भगत, गुणाकर शेट्टि, योगेश राणे, आत्माराम ठाकुर,संजय देवरुखकर यांनि प्रचंड परिश्रम घेतले.