


विरार (पूर्व) स्टेशन येथील बाजारवार्ड च्या बाजूच्या परिसरात वास्तव्यास असणारे व सामान्य नागरिकाच्या मदतीला धावून जाणारे आमचे मित्र झहीर शेख (समाजसेवक) यांच्या माहितीनुसार तसेच तेथील राहिवाश्यांच्या तक्रारी नुसार प्रहार जनशक्ती पक्ष,मी वसईकर अभियान,संघर्ष सामाजिक संघटना आणि एकत्व मित्र मंडळ ह्या सर्वांनी संघटित रित्या एकत्र येऊन बाजार वॉर्ड हरबा देवी मंदिराच्या च्या बाजूला असणाऱ्या विहिरीचं निरीक्षण करण्यात आले.त्या विहिरीमध्ये प्लास्टिक बॉटेलस,कागदाचा कचरा,लाकडी फळी,झाडांचा पालापाचोळा,व अन्य कचरा अश्या प्रकारे कचऱ्याचा साम्राज्य कित्येक महिन्यापासून त्या विहिरीमध्ये साचून राहिला होता.म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष,मी वसईकर अभियान ,संघर्ष सामाजिक संघटना आणि एकत्व मित्र मंडळ हे सामूहिक रित्या एकत्रित येऊन सर्वांनी विहिरींची पाहणी करून ती विहीर स्वछ करन्यासाठी आणि त्यावर लोखंडी जाळी चे आवरण लावण्यासाठी महानगरपालिकेला निवेदन-अर्ज स्वरूपात देण्यात आले.
त्या विहिरिची स्वछता करून देने हे v.v.m.c च्या निदर्शनास आणून दिले आहे.म्हणून व.वि.श.म.चे आयुक्त आणि प्रभाग क्रमांक C मधील स्वछता अधिकारी ह्यांना विनंती की आपण ह्या ठिकाणी तसदी घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे.

यावेळी आमच्या सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते,मी वसईकर अभियान व संघर्ष सामाजिक संघटनेचे आणि एकत्व मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.