

नालासोपारा (राजेश चौकेकर) : विरार शहरातील पावसाळ्यापुुर्वी पुर्ण होणारे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कोरोनाचे कारण देऊन पुर्ण न केल्याने पावसाळ्यात व गणेशोत्सव काळात मनवेलपाडा विभागातील नागरिकांना खड्यातुन रस्ते शोधत वाट काढावी लागली होती.या गोष्टीची दखल घेऊन शिवसेना विरार शहर उपप्रमुख श्री.उदय अ.जाधव यांनी त्वरीत महानगरपालिकेकडे पत्र व्यवहार करून १५ दिवसाच्या आत मनवेलपाडा विभागातील रस्त्याचे काम पुर्ण करण्याची मागणी केली अन्यथा विरार शिवसेना महानगरपालिकेचा निषेध नोंदवुन जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे स्व:ताच्या खर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेईल असे निवेदन पत्र आयुक्त साहेबांना दिले.या विषयी महानगर पालिकेचे मान.आयुक्त डी.गंगाथरन यांनी योग्य दखल घेत पाऊस कमी होताच मनवेलपाडा विभागातील सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याची मोहिम हाती घेतली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.याविषयी महानगरपालिकेकडे योग्य पाठपुरावा करण्यासाठी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख श्री.रविंद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.जिल्हाप्रमुख श्री.शिरीष (दादा) चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांनी विशेष सहकार्य केले तसेच विभागप्रमुख प्रविण आयरे, उपविभागप्रमुख संतोष राणे, सुनील चव्हाण शाखाप्रमुख तुकाराम भुवड, चंद्रकांत सावंत, महिला आघाडीच्याा सौ.रोशनी रा.जाधव, सौ.साक्षी उ.जाधव युवासेनेचे रोहित कदम, दुर्वेश देसाई, सुरज हातणकर, सागर नाचरे यांनी वरिष्ठ पदाधिकारी यांच्याक़डे पाठपुरावा केला.