


व.वि.श.म.न.पा.केच्या हद्दीत असलेल्या शिरसाट येथील राऊत पाड्यातील आदिवासीना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून ५० ते ६० कुटुंबीयांना पाणी टंचाईची झळ बसत आहे राउत पाड्यातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी कोसनकोस लांब जावे लागत आहे पाण्यासाठी ते जिवाचे रान करत आहेत विरार आगाशी येथील विकास भास्कर वर्तक याने वनखात्याच्या जमीनीवर मातीभरावा साठी खोदलेल्या २०० फुट खडयातुन ह्या पाड्यातील महिला गढूळ पाणी पिण्यास विवष होत आहेत महापालीकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडी च्या नगरसेविका रमाताई किणी यांच्या प्रभागात राऊत पाडा येतो मात्र या पाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहताना नगरसेविकेने या पाड्यावर दुर्लक्ष केले असल्याचे आरोप स्थानिक गावकरी करत आहेत गावकऱ्यांनी अनेक वेळा महापालिकेत तसेच नगरसेविकेकडे पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी विनवण्या केल्या निवडणूकी पूर्वी नगरसेविका रमाताई किणी यांनी राऊत पाड्यात तीन कुपनलिका लावून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र निवडणूक झाल्यानंतर आजतागायत त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही राऊत पाड्याच्या बाजूस लागून विकास भास्कर वर्तक दिपक कोंडकर व डाॅ.जोगळेकरांच्या वाड्या आहेत त्या वाड्यात महापालिकेने नळजोडणी केलेली आहे मग स्थानिकांना नळ जोडणी का करून देत नाहीत असा सवाल गावकरी करत आहेत हे वाडीवाले झाडांना भरपूर पाणी घालत आहेत परंतु पाड्यातील आदिवासी बांधवांना एक थेंब हि पाणी दिले जात नसल्याने वाडी मालक व महापालिके विरुद्ध स्थानिक गावकऱ्यांनी आगरी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास हरी पाटील यांच्या कडे तक्रार केली आहे . कैलास पाटील यांनी राऊत पाड्यातील आदिवासींची पाण्यासाठी होत असलेली होरपळ पाहून महानगर पालिकेस इशारा दिला आहे लवकरात लवकर राऊत पाडयाचा पाणी प्रश्न निकालात काढावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल.