

( भाग १) ( पत्रकार अतुल साळवी)
वसई : एैतिहासिक शहर , शुर्पराक नगरी अशी अोळख असलेले शहर म्हणजे नालासोपारा. पण आता या शहराची नविन अोळख समोर येत आहे ती म्हणजे ” वाहतुक कोंडीचे शहर”.
या वाहतुक कोंडीला जितके जबाबदार बेजबाबदार वाहन चालक, वाहतुक पोलीस आहेत त्या पेक्षा कैक पटीने जबाबदार आहेत ते म्हणजे येथील विरुध्द दिशेला असलेले रिक्शा तळ.
नालासोपारा पुर्वेस असलेले महत्वाचे रिक्शा तळ म्हणजे आचाळे रिक्शा तळ, प्रगती नगर / मोरे गांव रिक्शा तळ, हायवे / धानिव बाग/ संतोष भुवन रिक्शा तळ.
बारकाईने या तळांचे निरिक्षण केल्यास असे दिसून येईल की, हे सर्व रिक्शा तळ नेमके विरूध्द दिशेला आहेत.
नालासोपार्याच्या दक्षिण दिशेस आचोळे गांव / एव्हरशाईन आहे. पण या ठिकाणी जाण्यासाठी असलेले रिक्शा तळ विरूध्द दिशेला म्हणजे उत्तरेकडे तोंड करून आहेत. त्यातच बापा सिताराम बाजार पासून ते नरसिंग दुबे मैदाना पर्यंतचा दुतर्फा रस्त्यावर अनधिकृत रिक्शा तळाने व्यापल्यामुळे येथे वाहतुक कोंडी ही नित्याचीच झाली आहे.
नालासोपारा उड्डान पुला खाली असलेल्या दुतर्फा रिक्शा तळामुळे थेट राधाकृष्ण उपहारगृहा पर्यंत वाहतुक कोंडी होत असते.
तुळींज पोलीस ठाण्या समोर असलेल्या रिक्शा तळामुळे सेंट्रल पार्क पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्यावर नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
नालासोपारा उड्डान पुला खाली वाहतुक पोलीसांच्या डोळ्या देखत नरसिंग दुबे मैदाना समोर अनधिकृत रिक्शा तळ चालु झाल्यामुळे आचोळे गावा कडुन स्टेशनला येणारा रस्ता रोखला जातो. ( क्रमश:)