

◆ धडक कामगार युनियनच्या कार्यालयाच्या उद्घघाटन प्रसंगी राहणार उपस्थित
वसई : धडक कामगार युनियनच्या वसई जनसंपर्क कार्यालयाचे उद्घघाटन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते आज सकाळी 11 वा. (मंगळवार, 8 डिसेंबर) रोजी शास्त्रीनगर, इंडीयन ओव्हरसिज बँक जवळ, वसई (प.) याठिकाणी होणार आहे.
राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे या युनियनचे प्रेरणास्थान असून धडक कामगार युनियन चे आज महाराष्ट्रभरात 10 लाखांहून अधिक मेम्बरर्स आहेत. कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या युनियनचे हजारो कंपन्यांमध्ये जाळे आहे. कामगारांना न्याय देणारी एकमेव अशी प्रतिष्ठित युनियन म्हणून आज महाराष्ट्रात भरात या युनियनची ख्याती आहे.
महाराष्ट्र प्रदेश, उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी जास्तीतजास्त संख्येने कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी केले आहे.