.

काल नायगाव स्थित विश्वकर्मा सेवा संस्था यांच्यावतीने विश्वकर्मा महा पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विश्वकर्मा सेवा संस्था मंडळाच्यावतीने विश्वकर्माजीं ची मूर्ती स्थापन करण्यात आली. विश्वकर्मा जी ना ब्रह्माजी मी जेव्हा सृष्टी स्थापन केली होती तेव्हा सृष्टीला कलात्मक रीत्या घडवण्याचे काम दिले होते तेव्हापासून पृथ्वीवरचे पहिले इंजिनिअर किंवा कलेची देवता म्हणून विश्वकर्माजी ना ओळखण्यात येते.
विधिवत मूर्तीपूजन, मूर्ती स्थापना असं सर्व झाल्यानंतर याच सेवाभावी संस्थेने नायगाव पूर्व मध्ये पूजे निमित्त भंडारा जेवणाचे आयोजन केले होते तत्पूर्वी मंडळांमध्ये विश्वकर्मा देवाची पूजा झाल्यानंतर इथल्या महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाला व आप पूजेला समाजसेविका व युवाशक्ती फाऊंडेशन व स्नेहा फाऊंडेशनच्या अध्यक्ष कर्मवीर स्नेहा जावळे यांना अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते व नायगाव पूर्व तील युवाशक्ती फाऊंडेशन उपाध्यक्ष विद्या गऊल यांना बोलावण्यात आले होते. जावळे मॅडमने या कार्यक्रमात महिलांना महिला-मुक्ती व घर याचा ताळमेळ साधून घराची शांतता कशी टिकवायची याच्यावर माहिती दिली. विश्वकर्माजी यांच्या जीवना बद्दल थोडक्यात माहिती सांगून महिलांशी संवाद साधला. या संस्थेचे श्री उमेश विश्वकर्मा , अध्यक्ष शिव कुमार विश्वकर्मा, अध्यक्ष सुरेंद्र विश्वकर्मा, सचिव दिलीप विश्वकर्मा, कोषाध्यक्ष राजेंद्र विश्वकर्मा, उपसचिव कन्हैयालाल विश्वकर्मा, सल्लागार मोहन विश्वकर्मा, तहसल्लागार बलीराम विश्वकर्मा , आणि सहसल्लागार सुभेदार विश्वकर्मा व मोहन विश्वकर्मा.
महिला कार्यकर्ता खूप प्रमाणात उपस्थित होत्या त्यातच महिला 1 पुष्पा विश्वकर्मा ,नीलम संतोष शर्मा, रीता जयप्रकाश विश्वकर्मा, गुडिया कानहिया विश्वकर्मा. अशी सगळे संस्थेचे कार्यकर्ता यांच्या उपस्थितीत हा समारंभ आनंदात पार पडला.
कार्यक्रमाला येणार या भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन केल्याचे ही दिसते मास्क लावला होता आणि सॅनिटायझरचा वापर करताना दिसत होते, आणि मंडळांनी उत्तम रित्या या सगळ्या शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्नही केला.
नायगाव पूर्व कॉलनी विभागातील सर्व नागरिकांनी व भक्तांनी या महापूजेचा व भंडारा जेवणाचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *