
प्रतिनिधी : (प्रगती मोहिते) : शनिवार दिनांक १५ जून २०१९ रोजी दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने
मा.कार्यकारी आभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,पालघर यांना निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा. सद्या देशात महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले असून, पालघर जिल्ह्यात गेल्या दोन चार दिवसा पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. जशी पावसाची सुरुवात झाली आहे तसे विधुत वितरण कंपनीचे गलथान कारभार नेहमी प्रमाणे जनतेच्या समोर आले आहे. पावसाच्या पहिल्याच सरीत जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून, जिल्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोलमडून खाली पडले आहेत व जीर्ण विधुत वाहिनी (विधुत तारा)जागो जागी तुटून पडल्या आहेत. त्या मुळे दिवस दिवसभर अनेक ठिकाणी विधुत प्रवाह खंडित झाला असून, जव्हार मोखाडा या तालुक्यात व काही ग्रामीण भागात तर चार चार दिवसा पासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच संपूर्ण पालघर जिल्ह्यात विजेचे लपंडाव व वारंवार वीज खंडित होत असल्याने पालघर जिल्ह्यतील जनता हैराण झाली असून ,त्यांच्या भावनेचा उद्रेक कोणत्याही क्षणी होण्याची दाट श्यक्यता आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा त्रास आत्ताच सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालय व शाळेतील विदयार्थी, चाकरमानी, शेतकरी, छोटे उद्योजक, बागायतदार, फुल फळ दुग्ध उद्योग, दुकानदार, कामगार, मच्छिमार, छोटे घाऊक व्यापारी, नोकरदार , कारखानदार , तसेच तारापूर चिंचणी व किनारपट्टीवर होत असलेल्या डाय बनवणाऱ्या (डाय मेकिंग) छोट्या उद्योगांवर फार मोठ्या प्रमाणात नाहक त्रास व परिणाम होत असून, विद्युत वितरण कंपनीने पावसाळा सुरू होण्याच्या दोन महिने अगोदर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यतील सब डिव्हिजन च्या अधिकाऱ्यांना आप आपल्या विभागातील जीर्ण विधुत तारा व मोडकळीस आलेल्या विधुत खांब त्वरित बदलण्याचे व अनेक असलेल्या त्रुटी दुर करण्याचे आदेश दिले असते तर ,तसेच प्रत्येक विभागीय कार्यालयाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे बजावली असती तर त्याचा नाहक त्रास येथील पालघर जिल्ह्यातील जनतेला व ग्राहकांना झाला नसता, त्यामुळे पुन्हा एकदा विधुत वितरण कंपनीचा गलथान कारभार व त्यांची मनमानी मुळे जनता हैराण परेशान झाली असून, त्यांच्या भावनांचा उद्रेक कधीही कोणत्याही क्षणी होऊ शकतो. दोन दिवस वीज बिल भरण्यास दिरंगाई झाली तर वीज कंपनीचा कर्मचारी सरळ घरी येऊन वीज कनेक्शन खंडित करतो किंवा एखाद्याला वीज बिल जास्त आले असेल तर कमी करण्यासाठी सदरच्या कार्यालयात गेला तर प्रथम बिलाची भरणा करा नंतर बघू नाहीतर वीज कनेक्शन कापून टाकू म्हणून धमकावले जाते. मग चांगली सुविधा देणे व ग्राहकांना संतुष्ट ठेवणे वीज वितरण कंपनीला ही बंधनकारक आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणे व विजेचा खेळखंडोबा तसेच विजीचे मोडके खांब व जीर्ण तारा त्वरित दुरुस्त करून ,जनतेला त्रासा पासून परावृत्त करावे व महोदयांनी याचा गांभिर्याने विचार करावा . अन्यथा दलित पँथर पालघर जिल्ह्यच्या वतिने ऊग्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परीणामास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील याची नोंद वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. या वेळी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा. अविश राऊत, जिल्हा अध्यक्ष आयु. बिंबेश जाधव,जिल्हा महासचिव आयु. जगदीश राऊत, जिल्हा सचिव आयु. संतोष कांबळे,पालघर तालुका अध्यक्ष आयु. रोहित चौधरी, जिल्हा प्रमुख सल्लागार आयु.सिद्धार्थ जाधव. पालघर तालुका उपाध्यक्ष अहमद खान व कार्यकर्ते उपस्थित होते.
