वसई : (प्रतिनिधी) : वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकळल्या गेलेल्या 4 पिडीत मुलींची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन इसमांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्यावर अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 184/2019 अन्वये भादंविस कलम 370(5) पिटा अ‍ॅक्ट 3,4,5 पोक्सो 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करित आहेत.
यातील आरोपी क्र. 1 याने 4 पिडीत अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकळले होते. तसेच वेश्या गमनासाठी आरोपी क्र. 2 याने स्वत:चे फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याने दोघांविरोधात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी केली.
वसई तालुक्यात वेश्या व्यवसायात ढकळल्या जाणार्‍या पिडीतांचे प्रमाण भलतचे वाढु लागले आहे. बाहेरराज्यातील मुलींना नोकरीचे आमिष दाखवून मुंबईत आणि वसई परिसरात आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकळण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी वसई तालुक्यातील पोलिसांनी सदरचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम उघडण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *