
(प्रतिनिधी -आकेश मोहिते): २९ जुलै ला लागलेल्या १० वीच्या निकालामध्ये यावर्षी ही चांगलीच भिडत झाली होती… त्यातीलच सांगरुळ शिक्षण संस्था कोल्हापूर संचिलत रत्नागिरी जिल्हा लांजा तालुक्यातील व व्हेळ गावी स्थित रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ येथील गावच्या शाळेचा १० वी चा निकाल १००% लागून अभिमानाची बाब अशी की सलग १४ व्या वर्षी निकाल पूर्णपणे १००% लागल्याचे दिसून येते… सतत १४ वर्ष असा निकाल जणू विक्रमच म्हणता येईल.. गावातील शिक्षक वर्ग शाळेत शिकवत असताना ही काही मुलांच्या घरी जाऊन शिक्षण शिकवण्याचे उत्तम कार्य त्यांनी जोपासलं आहे. यशस्वी क्रमांक पटकावलेली मुले :-
(I) तेजल दीपक गुरव – 88 %
(II)अक्षय बाळकृष्ण बापर्डेकर- 86.40 %
(III)दिप्ती प्रकाश चिपटे- 84.60
(IV)प्रज्ञा संतोष भिंगे- 84.40
ह्या गावची शिक्षण पद्दत तेथील शिक्षणाची आवड, आणि त्यातही मुलांचं अभ्यासाबद्दलच प्रेम, आपुलकी, आणि पास होण्याची जिद्द दृष्टीस पडते…. ह्या गावातील अभ्यासासाबद्दल चे धडे तसेच आदर्श इतर गावांनी घेऊन यापुढे असाच निकाल प्रत्येक खेड्यापाड्यातून यावा यासाठी उत्तम उदाहरण व्हेळ गावाने मांडलेले आहे…