वसई (प्रतिनिधी): दिनांक 18 में 2020 रोजी मी वसई कर अभियान चे मिलिंद खानोलकर यांनी वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त आणि अप्पर पोलिस अधीक्षक (पालघर) वसई ह्यांना निवेदन इ मेल द्वारे पत्र पाठवून श्रीमती सरिता दुबे यांचे नगरसेवक पद रद्द करणे व गुन्हा दाखल करण्याची मी वसईकर अभियान ने मागणी केली आहे, समाज माध्यमावरील व्हिडिओ चे अवलोकन केले असता प्रथम दर्शनी असे निश्चित होते कोरोनाचा आपत्कालीन परिस्थिती मजुरांना गावी जाण्यासाठी सुटलेल्या रेल्वे च्या प्रवासासाठी प्रवाशांकडून गैर कानुनी पैसे जमा केले गेले.ते पैसे नगरसेविका सरिता दुबे व त्यांच्या कार्यकर्त्यांना वसूल केले असे प्रवाशांचे म्हणणे असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता शासनाने गरजू मजुरांना त्यांचे गावी परतण्यासाठी विनामूल्य रेल्वे प्रवासाची सोय केलेली होती व आहे. याचा अर्थ नगरसेविका सरिता दुबे हिने आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर केलेला आहे.तसेच त्या पदाच्या विश्वासहर्यातेला तडा पोहोचविला आहे.तिने फसवूनिकीचे गैर कानुनी काम केलेले आहे तसेच आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेत नागरिकांची पिळवणूक करून आपत्कालीन कायद्याचा देखील भंग केलेला आहे. या मुळे महापालिकेचा प्रतिमेला देखील तडा गेला आहे.त्यामुळे अक्षयम्य असे गुन्हेगारी व कायदा मोडणारे कृत्य करणारी नगरसेविका श्रीमती सरिता दुबे हिचे नगरसेवक पद रद्द होऊन तिला महापालिकेतील सर्व पदावर दूर करण्याची कारवाई विना विलंब करावी असे निवेदन पत्रात म्हटले आहे आणि त्याची प्रत रवाना पालघर जिल्हाधिकारी यांना पाठविले असे पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *