
मित्रहो…. आपल्या धर्मात शबरातला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या शबरात आहे. यानिमित्त अनेक लोक उद्या कब्रस्तानात प्रार्थनेसाठी जाण्याच्या तयारीत असतील. पण देशावर ‘कोरोना’चे असलेले संकट पाहता आपल्याला ‘शबरात’निमित्त घरातूनच प्रार्थना करण्याची विनंती आहे.
‘कोरोना’मुळे राज्य सरकारने देशभरात 144 कलम लागू केले आहे. देशभरात संचारबंदी आहे. अशावेळी देशाला ‘कोरोना’तून वाचवणे, हे आपले प्रथम कर्तव्य ठरते. अशा बिकट स्थितीत आपल्या देशाला, आपल्या सरकारला मदत करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
या नैतिक जबाबदारीचे पालन आपण कराल, देशात संचार बंदीचे आदेश पाहता *’शबरात’साठी गर्दी न करता घरातूनच प्रार्थना करून आपले धार्मिक अधिष्ठान अधिक मजबूत कराल, अशी आशा करतो.*