

काल बॅसिन कॅथोलिक बॅकेच्या अध्यक्ष पदाची निवड झाली निवडी नंतर आपलं पॅनलचे 38 वर्षीय रायन फर्नांडीस हे बॅकेचे नवे अध्यक्ष झाले.
मुळात बॅकेच्या सभासदाच्या चर्चेत नविन अध्यक्ष कोण हा विषय नसुन शब्द पाळणारा माजी अध्यक्ष कोण? हा विषय जास्त चर्चीला जात असुन हे माजी अध्यक्ष म्हणजे ओनिल जाॅन आल्मेडा हे आहेत.
अगदी आपला शांत स्वभाव आणी कार्य करण्याची पध्दत ह्या दोन चांगल्या गुणांमुळे ओनिल सर अवघ्या एका वर्षात बॅकेत सर्व कर्मचारी तसेच सभासदाचे आवडते झाले.गेल्या वर्षी ज्या वेळी अध्यक्ष पदा साठी ओनिल आल्मेडा ऊभे होते तेव्हा त्यांनी आपलं पॅनलच्या सर्व संचालकाना एक वचन शब्द दिला आणी तो म्हणजे मी पक्त एक वर्षा साठी बॅकेचे अध्यक्ष पद घेत आहे पुढची टर्म तुम्ही ठरवाल त्या संचालकाना आपण अध्यक्ष करू आणी एक वर्षाचा कार्यकाळ संपताच त्यांनी स्वताहुन अध्यक्ष पदाचा राजीनाम बोर्डाच्या सभेत सादर केला आणी सर्वच संचालकाना धक्का बसला तसाच धक्का आमच्या सारख्या सभासदाना ही बसला की ईतका चांगला व्यक्ती ईतकं चांगलं काम करत असताना अचानक अध्यक्ष पदाचा राजीनामा का देत आहे? पण शब्द नाही पाळला तर ते ओनिल आल्मेडा कसले?
अगदी दिलेला शब्द पाळत त्यानी 11 हजार करोडची बॅक तसेच महाराष्ट्र राज्यात सतत एक नंबर राहीलेल्या बॅकेच्या अध्यक्षपद सोडताना आणी आपल्याला खुर्चीची काहीच हौस नाही हे सभासदाना दाखवुन देताना त्यांच्या मनाचे मोठेपण आपण सर्वच सभासदानी पाहीले आहे.
पुढील काळात ते आपलं पॅनल घट्ट करून नवनिर्वाचीत अध्यक्ष रायन फर्नांडीस ह्याना सहकार्य करून बॅकेला अजुन पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणीक प्रयत्न करत राहतील ह्यात शंका नाही.
ह्यालाच मनतात खुर्चीचा मोह बिलकुल नाही कारण खुर्ची सोडण्या साठी बरेच लोक झगडतात पण हीच खुर्ची आपण स्वतःहून सोडत आहोत ह्यात खुप भाग्य आहे.
ओनिल सर तुम्ही पुढच्या वेळी एक वर्षे नवे तर पुर्ण पाच वर्षे अध्यक्ष पदी रहावे असे आमच्या सभासदाच्या तुम्हाला शुभेच्छा