

बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्ष प्रमूख यांची भेट घेतली असल्याने चर्चेला उधाण आलेच आहे ते शिवसेनेत जाणार का ? की त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करणार ? शिवसेनेकडून कोणती ऑफर देण्यात आली आहे ? तसेच कोणत्या निमित्ताने भेट झाली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी शमशुद्दीन खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बहुजन महा पार्टी विधान सभेच्या निवडणूकीत कोणत्याही पक्षांशी गठबंधन करणार नसून सदरची ही सदिच्छा भेट होती व गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी उध्दव ठाकरे साहेबांना भेटलो असून महाराष्ट्रात बहुजन महा पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे बहुजन महा पार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी सांगितले आहे.