
Weiss Fund ही संस्था कबीर बॅनर्जी प्रीडॉक्टोरल फेलोशिपच्या माध्यमातून, अग्रगण्य शैक्षणिक संस्थामध्ये विकास अर्थशास्त्रातील संशोधकांची नवी पिढी तयार करण्याच्या दृष्टीने, तसेच विकसनशील तसेच अविकसित देशांतील संशोधकांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या उद्देशाने आघाडीच्या शैक्षणिक संस्थांसोबत काम करते. सक्षम उमेदवारांना दोन वर्षांच्या प्रीडॉक्टोरल पदांवर प्रवेश , आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अश्या स्वरुपात Weiss Fund समन्वयाचे काम करत असते. ह्या प्रक्रियेअंतर्गत निवडलेले कबीर बॅनर्जी प्रीडॉक्टोरल फेलो जगातील काही नामांकीत अर्थशास्त्रज्ञांसोबत थेट काम करतात.
ह्यावर्षी, फेलोशिपसाठी २९ देशांमधील २५० पात्र उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले होते. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत ह्या उमेदवाराना लेखी परीक्षा व मुलाखतीचे अनेक टप्पे पार पाडावे लागले. अंतिम फेरीत निवड झालेल्या १४ उमेदवारांपैकी एक नाव आहे शशांक पाटील
शशांकने दहावीनंतर पुढे विज्ञान शाखेत अर्थशास्त्र विषय घेऊन सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. अर्थशास्त्र विषयातील त्याची रुची आणि गती पाहून सेंट झेवियर्स महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्याला पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स मधून बीएससी इकॉनॉमिक्स पूर्ण करण्याची शिफारस केली. अर्थशास्त्रात पदवीधर झाल्यानंतर पुढील शिक्षण किंवा संशोधनासाठी परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी शशांक गेले चार महिने विविध पर्याय आजमावत होता.
लवकरच तो शिकागो विद्यापीठातील बेकर फ्रीडमन इन्स्टिट्युट अंतर्गत डेव्हलपमेंट innovation लॅब मध्ये संशोधक म्हणून काम करण्यासाठी रुजू होईल. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिकागो सारख्या नामांकित विद्यापीठात अर्थशास्त्र विषयात संशोधन करण्यासाठी शशांक पाटील याची निवड झाली त्याबद्दल त्याचे, त्याच्या गुरुजनांचे आणि मातापित्यांचे अभिनंदन.
रामजीबाबा उत्सव मंडळ,वाळुंजे
https://bfi.uchicago.edu/kabir- banerjee-predoctoral-fellowship