पालघर दि. 30 :- पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी,पालघर डॉ.किरण महाजन, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 03 ऑक्टोबर 2021 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालीवधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागु करीत आहे.
1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा‍ शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
2) कोणतीही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.
4) व्यक्तीचे अथवा प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
5) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
6) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहाचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकणयाची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगरसोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.
वरील कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागु असणार नाही.

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 3 ऑक्टोबर ते दि16ऑक्टोबर
पर्यंत मनाई आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *