

वसई, प्रतिनिधी : वसई तालुका पूर्व पट्टीतील भाताने केंद्रातील जि प शाळा जांभुलपाडा येथील शिक्षिका विद्या नाईक यांनी त्यांच्या शाळेतील 1ली ते 5वी च्या मुलांना ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोबर या 3 महिन्याच्या सर्व विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित कृतीपत्रिका(स्वाद्याय पत्रिका) यांच्या झेरॉक्स करून त्या प्रत्येक पाड्या वस्तीवरील मुलांच्या घरी जाऊन वाटप केले. गरीब मुले ज्यांच्याकडे कोणत्याही ऑनलाइन सुविधा नाहीत अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये ,या ध्यासापोटी विद्या नाईक यांनी स्वखर्चाने 4025 झेरॉक्स करून त्याना मराठी,गणित,परिसर अभ्यास ,हिंदी,इंग्रजी या विषयाची प्रत्येकी स्वाध्याय पुस्तिका तयार करून वाटप केली.त्यासोबतच लेखनाचे साहित्य पेन पेन्सिल रबर याचेही वाटप केले.हे सर्व साहित्य 22।10।2020 रोजी वाटप करण्यात आले.त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
खूपच छान बातमी दिली आपण धन्यवाद आपल्या टीम चे
आदरणीय सौ.विद्या नाईक मॅडम चे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल “युवाशक्ती” ने घेतली त्याबद्दल युवाशक्ती ला धन्यवाद..!
आदरणीय सौ.विद्या नाईक मॅडम यांना राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद द्वारा खूप खूप शुभेच्छा..!
आपले कार्य असेच मंगल्यातेने व निर्विघ्न पणे सुरू राहावे या साठी श्री.साई नाथांना प्रार्थना..!
श्री.पुरुषोत्तम शिवाजी देशमुख
(सचिव,महाराष्ट्र राज्य,राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद)