मोखाडा : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. परंतु आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील किती कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. निवासी राहण्याचा दिला, जाणारा भत्ता दिशाभूल करून लाटणाºया अशा कर्मचाºयांवर कारवाईचे हत्यार उपसण्याची गरज आहे

याबाबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने मोखाडा गटविकास अधिकाºयांना २३ जुलै रोजी पत्रव्यवहार करून पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत सर्वच कर्मचाºयांना निवासी राहण्याबाबत सूचना कराव्यात बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात यावी, या संदर्भातील निवेदन देऊन १५ दिवसात कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कामाच्या ठिकाणी न राहणाºया २०० ग्रामसेवकांवर ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारवाई केल्याचे समोर आले होते. यावेळी त्यांचे घरभाडेही बंद करून कायमचे प्रमोशन्स रद्द करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्र मगड या तालुक्यातील ग्रामसेवक बांधकाम अधिकारी शिक्षक असे सर्वच प्रशासकीय अधिकारी कामाच्या ठिकाणी राहत नाहीत.
नाशिकवरून ये – जा
च्जव्हार मोखाड्यातले काही मोजके कर्मचारी वगळता सर्वच कर्मचारी नाशिक वरून ये-जा करतात. याचा परिणाम विकास कामांवर होत असून मोखाडा पंचायत समितीच्या बीडीओ संगीता भांगरे काय पाऊल उचलतात याकडे साºयांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *