

वसई(प्रतिनिधी):प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्ती तो जणू सरकारी कर्मचारी असल्याच्या थाटात काम करताना दिसतो. शासकीय कार्यालयात खाजगी व्यक्तींना कामास न ठेवण्याबाबत शासनाचे परिपत्रक असताना सर्वत्र शासकीय कार्यालयांमध्ये आज ही खुल्लमखुल्ला खाजगी व्यक्ती शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वावरताना दिसतात.
वसई तहसीलदार कार्यालयात बसणाऱ्या व सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे काम करीत असणाऱ्या खाजगी व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात युवाशक्ती एक्सप्रेसने दि. 4/3/2020 रोजी तहसीलदार वसई यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र सदर प्रकरणी तत्कालीन तहसीलदार किरण सुरवसे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. सदर प्रकरणी कारवाई का केली नाही या बाबत किरण सुरवसे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी युवा शक्ती एक्सप्रेसने केली आहे.
या संदर्भात युवा शक्ती एक्सप्रेसने नव्याने पदभार स्वीकारलेल्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्याकडे या प्रकरणी कारवाईसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. पाहू आता उज्ज्वला भगत काय कारवाई करतात की नाही.