विरार दि. १४/०६/२०२५, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची गरज भासत असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, क्रिमिलेअर दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार दि. १४/०६/२०२५ रोजी कातकरीपाडा, चंदनसार येथील जिल्हा परिषद प्राथमिक रुग्णालयामध्ये सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० या वेळेत आयोजित केलेले आहे.
सदरचे शिबिर नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री. राजनजी नाईक व वसई विरार जिल्हा अध्यक्षा सौ. प्रज्ञाताई पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित करण्यात आलेले असल्याची माहिती प्राध्यापक डी. एन. खरे यांनी दिली. तरी सर्व विद्यार्थी व नागरिकांना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्राध्यापक डी. एन. खरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *