
शासन निर्णयानुसार स्वेच्छेने धान्याचा हक्क सोडावा
प्रतिनिधी :
वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्याकडे शासकीय नोकरी व चार चाकी वाहन आहे अशा नागरिकांनी स्वेच्छेने धान्याचा हक्क सोडावा.
या बाबतची अधिक माहिती अशी की अनेक शिधापत्रिका धारक असे आहेत की त्यांच्याकडे शासकीय नोकरी आहे व चार चाकी वाहन आहे, असे लोक शासनाच्या गरीबांकरिता धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत शासनाने आदेश काढला की अशा अपात्र शिधापत्रिका धारकांना धान्य दिले जाऊ नये. शासनाची धान्य योजना ही गोरगरीबांकरिता आहे. त्याचा लाभ शासकीय नोकरी व चार चाकी गाडी असलेले शिधापत्रिका धारक घेत आहेत. या पार्श्वभूमीवर वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे. वसई तालुक्यात आतापर्यंत २०० च्या वर नागरिकांनी धान्यावरील हक्क सोडल्याची माहिती तहसीलदार उज्वला भगत यांनी दिली आहे.