
शाहू ,फुले,आंबेडकर,साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट यांची नुकतीच निवड करण्यात आली. विचारमंचचे अध्यक्ष अशोक शिंदे यांचे हस्ते निवडीचे पत्र देऊन ढोबळे आणि सकट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे म्हणाले की ढोबळे आणि सकट यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. आणि यापुढेही सामाजिक विचारमंचच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करतील असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी ऍडव्होकेट महेश शिंदे, पो.कॉ. अनिल हराळ, डॉ. संतोष गिऱ्हे,(उमंग फाउंडेशन. अ. नगर )आरती शिंदे, होमगार्ड शुभम खुडे, सुनिल सकट, गणेश ढोबळे, महेंद्र गिऱ्हे, धीरज ढोबळे आदी उपस्थित होते.