
वसई : (पुर्वा साळवी ): कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जाहिर केली. २४ मार्च २०२० पासून सार्या देशासह महाराष्ट्रात टाळेबंदीचे परिणाम गोरगरीब जनतेवर जाणवू लागले आहेत.
वसई तालुक्यातील पोमण , शास्ती पाडा , शिलोत्तर येथील मजूर वर्गातील ७५ कुटूंब अत्यंत हालाकीची दिवस काढीत आहेत.
टाळेबंदी मुळे हाताला काम नाही, खिश्यात पैसे नाही आणि त्यामुळे घरात धान्य नाही अश्या विचित्र परिस्थितीत ही ७५ कुटूंब शासकिय मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसली आहेत.
मात्र या कुटूंबांकडे शिधापत्रिकाच नसल्यामुळे शासकिय स्तरावर मिळत असलेल्या मदतीसाठी ही सारी कुटुंब बाद ठरली आहेत.
तेंव्हा आता महानगर पालिकेच्या प्रमाणे वसई तहसिलदारांनी देखील या परिसरात गरिब कुटूंबांसाठी अन्नछत्र चालू करण्याची मागणी येथील नागरिकांनी एकमुखाने केली आहे.