


शिवजयंती निमित्त आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसची ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा 19 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संदेश वाघ तसेच राष्ट्रीय सचिव डॉ. संतोष बनसोड यांनी जाहीर केले आहे. आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या फेसबुक पेजवरून अनेक मान्यवर या विषयाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विचाराचा ऑनलाईन पद्धतीने आढावा घेणार आहेत. या कार्यशाळेचे पहिले पुष्प डॉ.विजय मापारी यांनी 19 फेब्रुवारी 2021 रोजी गुंफले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती’या विषयावर उदबोधित करताना त्यांनी शिवरायांची अर्थनीती ही रयतेचे हित जपणारी होती असे असे स्पष्टपणे प्रतिपादित केले. छत्रपती शिवरायांची रयतवारी पद्धत, महसूल पद्धती,सुरतेवरील स्वारी तसेच महसूल जमा करण्याच्या पद्धती यावर सखोल विवेचन केले. 21 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ. संतोष बनसोड अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी ‘शिवरायांच्या वैचारिक जडणघडणीत राष्ट्रमाता जिजामाता यांचे योगदान’ या विषयावर भाष्य केले.डॉ. चंद्रकांत चव्हाण अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणार आहेत.तसेच डॉ. संदेश वाघ अध्यक्ष इतिहास व पुरातत्त्वशास्त्र अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठ हे ‘स्वराज्य निर्मितीत शिवरायांची भूमिका’ या विषयावर भाष्य करणार आहेत.
डॉ.हरी नारायण जमाले अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ एस एन डी टी विद्यापीठ तसेच डॉ. व्यंकटेश लांब अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद,डॉ.श्याम कोरेटी अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. डी.एन.वाघ अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ संत कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ह्यांनी या कार्यशाळेस सदिच्छा दिल्या आहेत व हे यथायोग्य मार्गदर्शनही करत आहेत. प्रा. डॉ. मनीषा ज.वर्मा एस.पी.डी.एम महाविद्यालय शिरपूर,जि.धुळे ह्यांनी ‘शिवाजी महाराजांचे न्यायिक धोरण’ या विषयावर भाष्य केले . प्रा.डॉ. दशरथ धर्माजी आदे,इतिहास विभागप्रमुख सदस्य इतिहास अभ्यास मंडळ गोंडवाना विद्यापीठ व श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा,जि. गडचिरोली हे ‘बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज’ या विषयावर भाष्य करणार आहेत. तसेच प्रा. डॉ. कुसु्मेंद्र ग.सोनटक्के इतिहास विभाग प्रमुख या. द. व देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तिवसा जि. अमरावती हे ‘रयतेचे राजे शिवाजी महाराज’या विषयावर भाष्य करणार आहेत. डॉ.जयवंत नथुजी काकडे इतिहास विभाग प्रमुख विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, जि.चंद्रपूर हे ‘शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण वर्तमानाच्या संदर्भात’या विषयावर भाष्य करणार आहेत. तसेच प्रा. डॉ. संदीप डोंगरे इतिहास विभाग येवडा जि. अमरावती हे ‘शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर भाष्य करणार आहेत. तसेच प्रा. किशोर चौरे इतिहास विभागप्रमुख महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर, जि. चंद्रपूर हे ‘युगपुरुष शिवाजी महाराज’ या विषयावर करणार आहेत.तसेच प्रा. डॉ. प्रफुल्ल राजुरवाडे हे शिवरायांच्या कार्यावर भाष्य करणार आहेत.डॉ. योगेश दूधपचारे जि.चंद्रपुर हे ‘शिवाजी महाराजांचे नैसर्गिक पर्यावरण धोरण’ या विषयावर भाष्य करणार आहेत. तसेच प्रा. गजानन सोडनर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मालेगाव जि. यवतमाळ हे विषयावर भाष्य करणार आहेत. सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस विद्यार्थी युनिटच्या विविध पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.त्यामध्ये भदंत मैत्रेय घोष आयुपाल थेरो,डॉ.किरण काळे डॉ. कोंडीबा हटकर सिंधु लोणकर, मोनिका चव्हाण,प्रा. विकास गवई, भरत हिवराळे,गौतम घाडगे, निशा भैसारे,भाग्यश्री घाडगे आदी.
Very good information & it will help to fill gap between society.