
दिपावली सणा निमित्त “शिवसेना व शिवप्रेरणा फाऊंडेशन यांच्या तर्फे प्रथमतः वसई तालुक्यात ऑनलाईन भव्य घरगुती रांगोळी स्पर्धा बक्षिस समारंभ” आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून , सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक :- कुमारी दिशा पाटिल , व्दितीय क्रमांक :- कुमारी नेत्रा बगाडीया तसेच तृतीय क्रमांक :- सौ.नेहा चौधरी असे या स्पर्धकांनी सदर स्पर्धेत क्रमांक मिळविला असून काल रविवारी शिवप्रेरणा फाऊंडेशन तर्फे स्पर्धाकांच्या घरी जाऊन त्यांना पारितोषीक देण्यात आले.सदर वेळेस शिवसेना विभाग प्रमुख व शिवप्रेरणा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.प्रशांत कदम , शिवसेना माजी वसई तालुका संघटक व शिवप्रेरणा फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष/सचिव श्री.योगेश पाटील , शिवसेना विभाग प्रमुख व शिवप्रेरणा फाऊंडेशनचे खजिनदार श्री.राहुल पाटील , तसेच युवासेना वसई शहर अधिकारी व शिवप्रेरणा फाऊंडेशनचे कार्यकारी प्रमुख श्री.ह्रितिक शिंदे व युवासेना विभाग अधिकारी कु. दक्षिल पटेल हे सर्व प्रमुख उपस्थित होते .