दि. २७ जुलै २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची अंगीकृत वकील संघटना शिव विधी व न्याय सेनेतर्फे शिवसेना भवन येथे नवीन फौजदारी कायद्याविषयक व्याख्यानाचे आयोजन करीत उपस्थित वकिलांना मोफत नवीन फौजदारी कायद्याच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक माजी परिवहन मंत्री आणि वरिष्ठ नेते दिवाकर रावते हे होते. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सर्वांनी एकत्रित येऊन जोमाने काम करावे आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत शिव विधी सेनेच्या पदाधिकारी यांनी कायदेशीर मदत पोहचवावी अशा सूचना त्यांच्या उदघाटन भाषणावेळी बोलताना रावते साहेबांनी मांडल्या.
या कार्यक्रमात भारतीय दंड विधान ऐवजी लागू करण्यात आलेल्या भारतीय नागरिक संहिता’ या विषयावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सन्माननीय सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालायाचे जेष्ठ व अनुभवी वकिल ऍड. सुदीप पासबोला मार्गदर्शनापर केलेल्या व्याख्यानात फौजदारी कायद्यांमधील नवीन बदल आणि प्रक्रियेबाबत सखोल माहिती उपस्थित वकिलांना दिली.
कायद्याची माहिती ही तळागाळातल्या लोकांसोबत ग्रामीण स्तरावरील महिलांपर्यंतहि पोहचविण्याकरिता शिव विधी व न्याय सेनेनं जिल्हा व तालुका स्तरावर कार्यक्रम राबवायला सुरवात केली पाहिजे असे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या प्रा.सुषमाताई अंधारे यांनी मार्गदर्शनपर भाषणात म्हटले आहे. त्यापुढे बोलताना म्हणाल्या भाजप व देवेंद्र फडणवीस ज्या फेक नेरेटिव्हच्या आरोप आमच्यावर करीत आहे त्या मुळात खोट्या असून भाजपाच मराठा आरक्षणाबाबत लोकांमध्ये फेक नेरेटिव्ह तयार करीत आहे. संविधानाच्या आर्टिकल १६ मध्ये आरक्षणाची तरतूद असताना त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्व अधिकार केंद्र सरकारला असताना त्यांनी दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलावून विशेष बहुमताने हा विषय न सोडवता सर्व खापर उद्धव साहेबांवर फोडणे चुकीचे आहे. असे म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत कार्यक्रमाच्या विचारपिठावर शिवसेना सचिव पराग डाके ,शिव विधी व न्याय सेनेचे मार्गदर्शक ऍड. जगदीश सावंत, ऍड.सुभाष सुर्वे, ऍड. सतीश सकट, युवा सेनेचे महाराष्ट्र सह – सचिव ऍड. संतोष धोत्रे, शिव विधी व न्याय सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. नितेश सोनावणे, उपाध्यक्ष ऍड.सुरेखा गायकवाड, चिटणीस ऍड.सुमीत घाग, ऍड. ज्ञानेश्वर कवळे, समन्वयक ऍड.भूषण मेंगडे, कार्यकारणी सदस्य ऍड.गिरीश दिवाणजी हे मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संघटनेच्या मिडीया समन्वयक ऍड. दर्शना जोगदनकर यांनी केले तर आभारप्रदर्शन विदर्भ विभागीय अध्यक्षा ऍड.वर्षा जगताप यांनी केले. या कार्यक्रमाला शिव विधी व न्याय सेनेचे पदाधिकारी म्हणून कोकण विभागीय अध्यक्ष ऍड प्रवीण दबडे, सरचिटणीस ऍड. सोनाली मयेकर, सचिव ऍड. स्वप्ना कोदे, पुणे विभागीय अध्यक्ष ऍड. कोजल कदम, पालघर जिल्हा मुख्य समन्वयक ऍड. भरत पाटील, पालघर जिल्हाअध्यक्ष ऍड. दिनेश आदमणे, सरचिटणीस ऍड. कुणाल कोदे, उपाध्यक्ष आनंद घरत, जिल्हा चिटणीस ऍड. वैभव पाटील, वसई तालुका समन्वयक ऍड. भक्ती दांडेकर, तालुका अध्यक्ष ऍड. चंद्रकांत गडांकुश, ऍड. गणेश शिंदे, ऍड. शीतल मोहिले, ऍड.अरूल नाडर,ऍड.निलेश मगर, ऍड. धनराज कांबळे, ऍड.किर्ती पांचाळ,ऍड. वृषभ बोस ,ऍड.पूनम जाधव,ऍड. दीपिका पाटील,ऍड. सबिया काझी आदी वकील मंडळीसोबत महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून इतर २०० हून अधिक वकील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *