

काल गणेशोत्सव निमित्ताने कोकणातील चाकरमानी गावी जाण्यासाठी मानवेलपाडा येथे श्री. वैभव गावडे यांच्या कडे एकूण 52 गाड्यांची बुकिंग केलेल्या पैकी 30/8/19रोजी 18 गाड्या व 31/8/19 ला 32 गाड्या सोडण्यात येणार होत्या त्या पैकी 14 गाड्या सोडण्यात आल्या होत्या कारण 18 गाड्या सदानंद महाराज यांच्या मोर्च्या मुळे व मुंबई गोवा महामार्ग वरील अफाट ट्रॅफिक मुळे पोहचू शकत नाहीत ह्याच गोष्टी माहित असूनही स्थानिक नगरसेवक याने प्रवाश्यानीं घातलेल्या गोंधळाचा फायदा घेऊन राजकारण करून श्री वैभव गावडे याला पोलीस स्टेशन ला जमा करून लोकांची उष्टी सहानभूती घेण्याचा प्रयन्त केला; परंतु ही बातमी व विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब 10बसेस ची व्यवस्था श्री संजोग दादा यंदे, व श्री. प्रमोद दळवी यांच्या पुढाकाराने करून मोफत चाकरमान्यांना गावी पाठवून दिले त्यावेळी शिवसेना -भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी श्री. संजोग दादा यंदे,सचिव महाराष्ट्र प्रदेश तथा पालघर जिल्हा प्रभारी युवा मोर्चा. श्री. प्रमोद दळवी, विधानसभा संघटक, श्री प्रदीप शर्मासाहेब, श्री शिरीष दादा चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख श्री. स्वप्नील बांदेकर शिवसेना नगरसेवक, श्री. राजन नाईक, जिल्हा सरचिटणीस भाजपा व वि. श्री हितेश जाधव जिल्हाप्रमुख प्रहार संघटना श्री. प्रसाद पाटील, जिल्हाउपाध्यक्ष भाजपा व.वि या सर्वांचे सहकार्य मिळाले व स्वतः उपस्थित राहिले ; राजकारणा बरोबर समाजकारण असायला हवे हे आज पुन्हा शिवसेना -भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे.