दि 12 मार्च गुरुवार रोजी “शिवजयंती उत्सव 2020” महाराष्ट्रभर साजरी करण्यात येते वसई शिवसेना शाखा तर्फे वसई पारनाका येथे शिवाजी महाराजांच्या शिवप्रतिमेची पूजन केले तसेच शिवजयंती निमित्त आज सत्यनारायण महापूजा आयोजन केले, संध्याकाळी कोर्ट नाका ते पारनाका मोठ्या उत्साहात मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आले होते मिरवणुकीत ‘डोल तासे चे विशेष आकर्षक ठरले होते आणि शिवाजी महाराजांच्या पोशाखात हुबेहुब शिवाजी महाराज अश्वावर विराजमान झाले होते. मिरवणुकीत वसईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वसई तालुक्यातीला शिवसेना यांनी शिवाजी महाराजांच्या शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली व शिव मूर्तीचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला मनपाचे महापौर प्रविण शेट्टी, पंचायत समिती सभापती अनुजा पाटील
पोलीस निरीक्षक आनंत पराड, शिवसेना जिल्हा उप प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी कार्यक्रमाला भेट दिली व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले
आयोजक शिवसेना वसई शहर अध्यक्ष प्रमुख प्रथमेश राऊत व
शिवसेना वसई शाखा,महिला आघाडी,युवा सेना, शिवसैनिक यांनी शिवजयंती या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली

One thought on “शिवसेना वसई शहर शाखा आयोजित शिवजयंती उत्सव 2020 मोठ्या उत्साहात संपन्न…”
  1. खूप छान बातमी… धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *